Marathi Suvichar


Inspirational Marathi Suvichar

Marathi Suvichar

Hi, friends.
We bring you a wide collection of selected, mostly used marathi suvichar in marathi just like our marathi sms in marathi jokes. Here, you will find collection of marathi suvichar which are inspiring and fulfilled with knowledge. You can use them in your routine life across various condition and also you could share them with your friends and close ones on social media for inspiring and motivating them. Thank you !
for your visit to our site.

   List of all Marathi Suvichar:

  1. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
   दवबिंदू होऊन चातकाची तहान
   भागवणे जास्त श्रेष्ठ …

 

  1. सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
   पाप होईल इतके कमाऊ नये ,
   आजारी पडू इतके खाऊ नये ,
   कर्ज होईल इतके खर्चू नये ,
   आणि भांडण होईल इतके बोलू नये.

 

  1. व्यक्तीमहत्त्व सुंदर नसेल तर
   दिसण्याला काहीच अर्थ नाही.
   कारण सुंदर दिसण्यात आणि
   सुंदर असण्यात खूप फरक असतो.

 

  1. व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका
   आहे तो परिणाम स्वीकारा.
   अश्रू येणे हे माणसाला हृदय
   असल्याचे द्योतक आहे.

 

  1. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
   आणि आशीर्वाद घेऊन येतात,
   पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
   अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

 

  1. पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
   पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
   यालाच खरे आयुष्य म्हणतात.

 

  1. हृदयात नेहमीच जे परोपकाराची
   भावना बाळगतात,
   त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती
   यश आणि समृध्दी मिळते.

 

  1. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
   प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे.

 

  1. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
   दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.

 

  1. गोड आवाजात किमया असते,
   ज्याच्या आवाजात गोडवा,
   त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही.
   – संत दयालनाथ

 

  1. तुम्हाला तुमचे ध्येय
   गाठायचे असेल तर
   तुमच्यावर भुंकणाऱ्या
   प्रत्येक कुत्र्यावर थांबून
   दगड मारण्यापेक्षा
   नेहमी बिस्कीट जवळ
   बाळगा आणि पुढे चालत राहा …

 

  1. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर
   आपण आपला वर्तमानकाळ
   बिघडवत असतो
   म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून
   पुन्हा नव्याने कमाल
   लागल पाहिजे.

 

  1. काही वेळा जास्त विचार न करता
   घेतलेला निर्णय चांगला असतो.

 

  1. ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा।
   इतरांनी वहावा भार माथा।।’ -संत तुकाराम

 

  1. दारू पिऊन कोंणचेच प्रश्न सुटत नाही,
   हे अगदी खर आहे;पण ,मग
   ते दुध पिऊनही सुटत नाही.

 

  1. पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर
   आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
   -रवींद्रनाथ टागोर

 

  1. आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे
   काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
   -जॉर्ज बर्नार्ड शॉ

 

  1. प्रेम करणं ही एक कला आहे,
   पण प्रेम टिकविणे ही एक साधना
   आहे.- विनोबा भावे

 

  1. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणार्याला
   दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
   आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुध्दा करत नाही.

 

  1. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात……
   एक: वाचलेली पुस्तकं
   दोन: भेटलेली माणसं.

 

  1. सैन्यदलाच्या प्रतिकार करता येतो पण,
   कल्पनांच्या आक्रमणाचा प्रतिकार करता येत नाही.

 

  1. स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले,
   तरी दुसर्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात.

 

  1. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.
   चुकाल तेव्हा माफी मागा. अनं कुणी चुकलं तर माफ करा
   आपला दिवस आनंदात जाओ आणि मन प्रसन्न राहो.

 

  1. आंधळ्याला जसा प्रकाशाचा अर्थ समजत नाही,
   त्याच प्रमाणे स्वतः विचार न करणार्यला ग्रंथाचा
   अर्थ कळत नाही.

 

  1. हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे…
   नाहीतर डोळ्यातल्या अश्रुंना पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत.

 

  1. संयम आणि माफ करण्याची ताकद
   मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच,
   परमेश्वराला हे कधीच सांगू नका की
   तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर
   अडचणींना हे सांगा की
   तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.

 

  1. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते.
   त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
   कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
   उत्कृष्ट व्यत्की समजून जळत असते.

 

  1. प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी
   लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या
   जवळ आहे तोच खरा श्रीमंत.

 

  1. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे;
   पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल.

 

  1. जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते
   अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

 

  1. अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
   ही काही मोठी गोष्ट नाही..!
   आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
   जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
   कर्तबगारिने सुगंधित होते..!

 

  1. वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
   दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
   गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
   वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!
   शुभ सकाळ..

 

  1. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
   त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
   शुभ प्रभात

 

  1. ” देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी ,
   आईचे स्वप्न पुर्ण व्हावे हाच आशिर्वाद मागा ,
   तुम्हाला कधी स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही “……
   कारण आईचे स्वप्न हा एक असा संस्कार आहे जो आपल्या
   मुलाला कधीच वाकड्या वाटेवर जावू देत नाही.शिव सकाळ..

 

  1. टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.

 

  1. जीवनाच्या धकाधकीत खरोखर मोलाचे,जतन करण्यासारखे जर काही असेल,
   तर ते माणसाचे सजनशिल, संवेदनशिल,संवेदनाक्षम व्यक्तीमत्व होय.

 

  1. ह्रदयाच्या मखमली पेटीत
   ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत
   ती म्हणजे ”आई”.